जयंतरावांचा निर्णय  योग्यच ः पहा कशासाठी 

KOP20J62908_pr.jpg
KOP20J62908_pr.jpg
Updated on

कवठेमहांकाळ (सांगली) : सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दुष्काळी तालुक्‍यातील म्हैसाळच्या पाण्याने तलाव भरून देण्याचा घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. त्यांना शेतकऱ्यांविषयी कळवळा आहे. त्यांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे. 
असे मत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

माजी मंत्री घोरपडे म्हणाले, सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनसह तालुका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलत आहे. प्रशासनाचे काम कौतुकास्पद आहेच. सध्या म्हैसाळ योजना योजनेचे पाणी सुरू आहे.

दुष्काळी भागातील तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरून देण्याचा पालकमंत्री पाटील यांनी निर्णय घेतला आहे. घेतलेल्या निर्णयामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पाणी हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त घटक असून दुष्काळी भागातील तलाव भरल्यास भागातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 दुष्काळी भागातील तलाव हे म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरल्यास दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्यामध्ये जीवनमान उंचावण्यास मदत होईल. जिल्ह्यासह तालुक्‍याची माहिती पालकमंत्री पाटील यांना असून दुष्काळी भागातील तलाव सुरू असल्या म्हैसाळ योजनेचे भरावेत हा निर्णय योग्य आहे.

जलसंपदा मंत्री म्हणून जयंत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते दुष्काळी भागावर लक्ष देतील, ही अपेक्षा आता पूर्ण झाली आहे,असे प्रतिपादन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केले. यावेळी माजी सभापती भारत डुबले, पांडुरंग पाटील उपस्थित होते. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli DCC Bank recruitment latest update
Maharashtra pomegranate price latest update
Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Marathi News Esakal
www.esakal.com